Utha Utha Shri Sainath Guru - Kakad Aarti

उठा उठा श्री साईनाथ गुरु चरणकमल दावा
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा
गेली तुम्हां सोडुनियां भवतमरजनी विलया
परि ही अज्ञानासी तुमची भुलवि योगमाया
शक्ति न आम्हां यत्किंचितही तिजला साराया
तुम्हीच तीतें सारुनि दावा मुख जन ताराया
भो साईनाथ महाराज
भवतिमिरनाशत रवी
अज्ञानी आम्ही किती
तुमची वर्णावी थोरवी
ती वर्णितां भागले
बहुवदनि शेष विधि कवी

सकृप होउनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा
उठा उठा श्री साईनाथ गुरु चरणकमल दावा
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा

भक्त मनीं सदभाव धरुनि जे तुम्हां अनुसरले
ध्यायास्तव ते दर्शन तुमचें द्वारी उभे ठेले
ध्यानस्था तुम्हांस पाहुनी मन अमुचें धालें
परि त्वद्घचनामृत प्राशायातें आतुर झालें

उघडूनी नेत्रकमला
दीनबंधु रमाकांता
पाहिं बा कृपादृष्टीं
बालका जशी माता
रंजवी मधुरवाणी
हरीं ताप साईनाथा
आम्हीच अपुले कार्यास्तव तुज कष्टवितों देवा
सहन करिशिल ऐकुनि द्यावी भेट कृष्ण धांवा

उठा उठा श्री साईनाथ गुरु चरणकमल दावा
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा

Most popular songs of अजित कडकडे

Other artists of