Yuge Athavees

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा
जय देव जय देव
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा पावे जिवलगा
जय देव जय देव
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा
जय देव जय देव
ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा
जय देव जय देव
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा
जय देव जय देव

Most popular songs of अजित कडकडे

Other artists of