Mala Ved Laagale [Female]

Guru Thakur

रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे

नादावला धुंदावला कधी गुंतला मन बावळा
नकळे कसे कोणामुळे सूर लागले मनमोकळा
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला कुणी भेटले माझे मला
खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे

Most popular songs of बेला शेंडे

Other artists of Film score