Sath De Tu Mala

Ashvini Shende, Vishvajita Joshi

अलगद वा-यावर उड़ती बट सांगते तुला
हलकेच लवती पापणी बघ सांगते तुला
गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा
साथ दे तु मला साथ दे तु मला
साथ दे तु मला साथ दे तु मला

कोरड्या मातीस ही सर पावसाची सावरे,
मन पुन्हा का होत जाते वळीव वेडे बावरे
चिंब हे सोहळे वाहती की जसे ये पुन्हा गारवा
साथ दे तु मला साथ दे तु मला
साथ दे तु मला साथ दे तु मला

का तुझ्यापाशीच मन हे येत जाते सारखे
अन् पुन्हा तुझ्याविना हे जिंकूनी ही हारते
प्रेम हे पाखरू परतुनी की जसे सांजवेळी ये घरा
साथ दे तु मला साथ दे तु मला
साथ दे तु मला साथ दे तु मला

Most popular songs of बेला शेंडे

Other artists of Film score