Tu Shwaas Sare [Female]

दाटुनी आले आभाळ सारे
डोळ्यांत मेघास आसवे
नाते मनाचे का दुर झाले का आटली आसवे
दाही दिशांना आभास वेडे बेभान ली आठवे
तु श्वास सारे तु ध्यास सारे
आभास सारे बस तु ही तु
तु श्वास सारे तु ध्यास सारे
आभास सारे बस तु ही तु

अधुरी उरली कहानी अवेळी मनी दाटते
अधुरया हळव्या क्षणाचे धुके हे मला वेढते
दिसेना कोठे किनारे अजुनी तुला शोधते
जुळुनी नाते जीवाचे कळेना कसे मोड़ते
तु बंध सारे तु गंध सारे
तु रंग सारे बस तु ही तु
तु श्वास सारे तु ध्यास सारे
आभास सारे बस तु ही तु

वळूनी मागे जरासे पुसावे धुके आज मी
जपावे नाते सुखाचे जगावे तुझे स्वप्न मी
भिजुनी ओल्या क्षणांनी मिटावी पुन्हा पापणी
दुरावे मागे सरावे दिसावी पुन्हा ओढ ती
तू स्वप्न सारे तू स्पर्श सारे
तू हर्ष सारे बस तू हि तू
तू श्वास सारे तू ध्यास सारे
आभास सारे बस तू हि तू
तू बंध सारे तू गंध सारे
तू रंग सारे बस तू हि तू
तु श्वास सारे तु ध्यास सारे
आभास सारे बस तु ही तु

Most popular songs of बेला शेंडे

Other artists of Film score