Lallati Bhandar

AJAY GOGAVALE, ATUL GOGAVALE, SANJAY PATIL

नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार हेऽ
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार आहा

नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार हेऽ
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार आहाऽ
नवसाला पाव तू देवी माझ्या हाकंला धाव तू
हाकंला धाव तू देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू
देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू काम क्रोध परतुनि लाव तू
काम क्रोध परतुनि लाव तू देवी माझी पार कर नाव तू

डोळा भरून तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन तुझा महिमा गाईन
महिमा गाईन तुला घुगऱ्या वाहीन
घुगऱ्या वाहीन तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार हेऽ
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार आहाऽ
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
हेऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो भक्तीचा सागर
आहा

खणानारळानं वटी मी भरीन
वटी मी भरीन तुझी सेवा करीन
सेवा करीन तुझा देवारा धरीन
देवारा धरीन माझी वंजळ वरीन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी हेऽ
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार, आहाऽ
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
हेऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो भक्तीचा सागर

Most popular songs of अजय गोगवले

Other artists of Film score