Sakhe Tujhyavin Jagne

Ashok Powle

हे भलते अवघड आहे
सखे तुझ्याविन जगणे
सांगू मी काय कुणाला
मनातले तडफडणे
हे भलते अवघड आहे

विसरू मी कसा तो काळ
तव सहवासातील ते क्षण
विसरू मी कसा तो काळ
तव सहवासातील ते क्षण
ते अवघड होते अजुनी
ते अवघड होते अजुनी
प्रयास करुनि विसरणे
सांगू मी काय कुणाला
मनातले तडफडणे
हे भलते अवघड आहे

हे हे हे हे हे हे हे हे
जरी किती भांडलो तंडलो
ते होते गे जलताडन
जरी किती भांडलो तंडलो
ते होते गे जलताडन
अंतरी ची ओढ ती अमर
क्षणभराचे रुसणे फुगणे
सांगू मी काय कुणाला
मनातले तडफडणे
हे भलते अवघड आहे

गेलीस सोडूनि मजला
हे जगणे अवघड झाले
गेलीस सोडूनि मजला
हे जगणे अवघड झाले
कधी हॊईल यातून सुटका
मन आता गे थकले
सांगू मी काय कुणाला
मनातले तडफडणे
हे भलते अवघड आहे
सखे तुझ्याविन जगणे
सांगू मी काय कुणाला
मनातले तडफडणे
हे भलते अवघड आहे
हे भलते अवघड आहे

Most popular songs of हृषिकेश रानडे

Other artists of Film score