Aahe Maja

Ashok Patki

आहे मजा जगण्यात या
आल्या क्षणी हसण्यात या
हो अंधाऱ्या रात्रीलाही
आशेचे लुकलुकणारे
तारे किती हे सांग ना
हो आहे मजा जगण्यात या
आल्या क्षणी हसण्यात या

किरणांच्या सरकती
रांगोळ्या कोणासाठी
का थेंब हे थिरकती
पागोळ्या होण्यासाठी
किरणांच्या सरकती
रांगोळ्या कोणासाठी
का थेंब हे थिरकती
पागोळ्या होण्यासाठी
साऱ्या खुणा कळतात या
माझ्या कडे वळतात या
हो अंधाऱ्या रात्रीलाही
आशेचे लुकलुकणारे
तारे किती हे सांगना
हो आहे मजा जगण्यात या
आल्या क्षणी हसण्यात या

उडती रे गगनी या
हे पक्षी कोणासाठी
पाण्यावरी तरंगते
ही नक्षी कोणासाठी
उडती रे गगनी या
हे पक्षी कोणासाठी
पाण्यावरी तरंगते
ही नक्षी कोणासाठी
दाही दिशा माझ्याच या
माझ्याच मी धुंदीत या
हो अंधाऱ्या रात्रीलाही
आशेचे लुकलुकणारे
तारे किती हे सांग ना
आहे मजा जगण्यात या
हो आल्या क्षणी हसण्यात या
आहे मजा जगण्यात या
आल्या क्षणी हसण्यात या

Trivia about the song Aahe Maja by स्वप्निल बांदोडकर

Who composed the song “Aahe Maja” by स्वप्निल बांदोडकर?
The song “Aahe Maja” by स्वप्निल बांदोडकर was composed by Ashok Patki.

Most popular songs of स्वप्निल बांदोडकर

Other artists of Traditional music