Ata Tari Bolna

Manoj Yadav

भाव ते हृदयाचे जळले
शब्द ते प्रेमाचे रुसले
भाव ते हृदयाचे जळले
शब्द ते प्रेमाचे रुसले
रडले का क्षण सारे
पाहुन रंग रक्ताचे
निजले का हे नाते
का हे घडले
आता तरी बोल
आता तरी बोल बोल ना

निजला कसा हा सूर्य माझा
किरणांचे थेम्ब उडले कुठे
पदरात अंधार पडला
नशिबाचे हात सुटले कुठे
मन पाहते राग पुनःस
का हसतो चिडवून आज
रडले का क्षण सारे
पाहुन रंग रक्ताचे
निजले का हे नाते
का हे घडले
आता तरी बोल
आता तरी बोल बोल ना

तरपून सुख घाबरतो
दुःखाचे घाव सावरतो
ह्रदयाचे घाव हि ओले का असे
माझ्यात मी ना सापडतो
हा अंत का असा शिरतो
उरतो मी नेहमी
थोडे का असे ये ये
भाव ते हृदयाचे जळले
शब्द ते प्रेमाचे रुसले
रडले का क्षण सारे
पाहुन रंग रक्ताचे
निजले का हे नाते
का हे घडले
आता तरी बोल
आता तरी बोल बोल ना

Trivia about the song Ata Tari Bolna by स्वप्निल बांदोडकर

Who composed the song “Ata Tari Bolna” by स्वप्निल बांदोडकर?
The song “Ata Tari Bolna” by स्वप्निल बांदोडकर was composed by Manoj Yadav.

Most popular songs of स्वप्निल बांदोडकर

Other artists of Traditional music