Dolyat Punha

डोळ्यात पुन्हा अलवार खुणा
हलका हलका तो रंग जुना
आभास हा श्वासा मधला
छळतो तुला ही का सांग ना
डोळ्यात पुन्हा अलवार खुणा
हलका हलका तो रंग जुना

तू दिलेलं अखेरचं फुल तेही आता सुकल होत
चूक फक्त माझी नाही
थोडं तुझं ही चुकलं होतं

होती कुणी लाजरी माझ्या मनाची परी
भिरभिरणारी खळखळणारी वेडी खुळी बावरी
हाय तिचे हासणे नजरेतुनी बोलणे
ती दिसताना ती हसताना नादावले चांदणे
तो श्वास तिचा सहवास तिचा
विश्वास तिचा हा अजुनी मला
डोळ्यात पुन्हा अलवार खुणा
हलका हलका तो रंग जुना

चालता चालता पाऊल जेव्हा
त्या वळणावर पडलं होत
मिठीत होतो आपण दोघ
घडायचं ते घडलं होतं

बेभान केले कुणी त्या धुंदलेल्या क्षणी
जग विसरावे बेहोश व्हावे झाली अशी मोहिनी
ते ओठ ओठान वरी ती आग ह्या अंतरी
बुडलो प्रवाही उरले न काही
दोन्ही किनाऱ्यांवरी त्या पाऊस राती
दरवळली माती ती अनामिक नाती
तो गोड गुन्हा
डोळ्यात पुन्हा अलवार खुणा
हा हा हा
आता तरी तुला कळलं ना कि मी तोच आहे

Most popular songs of स्वप्निल बांदोडकर

Other artists of Traditional music