Tujha Dhyas
हे भास तुझे दिन रात असे
बेचैन जीवाला करती
हा छंद तुझा कि गंध
प्रिये दरवळतो अवती भवती
उधवून मला मी गातो
ये साद सुरांनी देतो
चाहूल तुझी कि फसवी वेडी आशा
तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा
तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा
धुके पांघरूनि पहाटे पहाटे
तुझी याद माझा जीव जाळते
सुटे भान सारे दिशा भूल होते
तुझा गंध जेव्हा सांज माळते
हवासा हवासा तरी सोसवेना
तुझ्या आठवांचा ऋतू सेरेना
आभास तुझा रिम-झिमतो
हरवून मला मी जातो
चाहूल तुझी कि फसवी वेडी अशा
तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा
तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा
कधी चिंब राती उगा भास होती
तुझ्या चेहऱ्याने चांद हासतो
कधी पावलांचा तुझ्या नाद येतो
जीवाला नव्याने वेड लावतो
कसे सावरावे मनाला कळेना
उरी मेघ दाटे परी ओघळेना
एकात गुलाबी होतो
बहरून पुन्हा मी येतो
चाहूल तुझी कि फसवी वेडी आशा
तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा
तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा
हे भास तुझे दिन रात असे
बेचैन जीवाला करती
हा छंद तुझा कि गंध प्रिये
दरवळतो अवती भवती
उधवून मला मी गातो
ये साद सुरांनी देतो
चाहूल तुझी कि फसवी वेडी आशा
तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा
तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा
तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा
तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा