Vate Vari
Mandar Cholkar
वाटेवरी काटे जरी चालायचे
कोडे भरकटलेले
धागे गुरफटलेले जोडायचे
हो आनंदी अश्रूंची चव चाखूया
सतरंगी स्वप्नांनी जग जिंकूया
आनंदी अश्रूंची चव चाखूया
सतरंगी स्वप्नांनी जग जिंकूया
शोधुया पुन्हा चुकलेल्या खुणा
झुकल्या पापण्या उघडाव्या
खुलताना कळ्या होती मोकळ्या
मिटल्या पाकळ्या उमलाव्या
पसरले किरण हे आशांचे
विसर अंधार हा
गवसले सूर ही भासांमधले
स्पर्श होता नवा हो
उलगडणारा बंध नात्यातला
गहिवरणारा हात हातातला
वाटेवरी काटे जरी चालायचे
कोडे भरकटलेले धागे
गुरफटलेले जोडायचे
हो आनंदी अश्रूंची चव चाखूया
सतरंगी स्वप्नांनी जग जिंकूया
आनंदी अश्रूंची चव चाखूया
सतरंगी स्वप्नांनी जग जिंकूया
शोधुया पुन्हा चुकलेल्या खुणा
झुकल्या पापण्या उघडाव्या
खुलताना कळ्या होती मोकळ्या
मिटल्या पाकळ्या उमलाव्या
आ आ आ आ आ