Asata Sameep Doghe

N Dutta, Shanta Shelke

असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे
शब्दांविना परंतु बोलून सर्व जावे
अतृप्त मीलनाचे विरहातही सुखाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे
असता समीप दोघे

फसवा वरून राग रुसव्यात गाढ प्रीती
हो फसवा वरून राग रुसव्यात गाढ प्रीती
होता क्षणिक टूर वेडी मनात भीती
दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे
असता समीप दोघे

दूरातही नसावा दोघांमध्ये दुरावा
हो दूरातही नसावा दोघांमध्ये दुरावा
स्पर्शाविना सुखाने हा जीव मोहरावा
ओठी फुलून यावे स्मित गोड सार्थकाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे
असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे
शब्दांविना परंतु बोलून सर्व जावे
असता समीप दोघे

Trivia about the song Asata Sameep Doghe by Asha Bhosle

Who composed the song “Asata Sameep Doghe” by Asha Bhosle?
The song “Asata Sameep Doghe” by Asha Bhosle was composed by N Dutta, Shanta Shelke.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock