Chanda Rani

Shrinivas Khale, Anil Mohile, G D Madgulkar

चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी

शाळा ते घर घर ते शाळा आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चालचालसी
रात्रभर तू चालचालसी दिवसा तरी मग कोठे निजसी
चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी

वारा वादळ छप्पन वेळा
वारा वादळ छप्पन वेळा
थारा नाही आभाळा
थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखसी
कसा गडे तू तोल राखसी पुढती पुढती पाय टाकिसी
चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी

काठी देखिल नसते हाती थोडी नाही विश्रांती
चढसी कैसी कशी उतरसी
चढसी कैसी कशी उतरसी निळ्या डोंगरी अखंड फिरसी
चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी

वाडा घरकुल घरटे नाही
वाडा घरकुल घरटे नाही
आई नाही अंगाई
आई नाही अंगाई
म्हणुनीच का तू अवचित दडसी
म्हणुनीच का तू अवचित दडसी लिंबामागे जाऊन रडसी
चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी

Trivia about the song Chanda Rani by Asha Bhosle

Who composed the song “Chanda Rani” by Asha Bhosle?
The song “Chanda Rani” by Asha Bhosle was composed by Shrinivas Khale, Anil Mohile, G D Madgulkar.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock