Chandanyat Phirtana

PT. Hridaynath Mangeskar, Suresh Bhat

चांदण्यात फिरताना
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात
चांदरात चांदरात चांदरात
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात

निजलेल्या गावातुन आले मी एकटीच
निजलेल्या गावातुन आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
पडले मागे कधीच ह्या इथल्या
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात जाणतात
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात
चांदरात चांदरात चांदरात
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात

सांग कशी तुजविनाच पार करु पुनवपूर
सांग कशी तुजविनाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन हे तारे फितूर श्वास तुझा
श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात पारिजात
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात
चांदरात चांदरात चांदरात

Trivia about the song Chandanyat Phirtana by Asha Bhosle

Who composed the song “Chandanyat Phirtana” by Asha Bhosle?
The song “Chandanyat Phirtana” by Asha Bhosle was composed by PT. Hridaynath Mangeskar, Suresh Bhat.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock