Dadacha Ghar Bai Unhat

JAYANT MARATHE, YASHWANT DEO

तुझी नि माझी जंमत वहिनी
तुझी नि माझी जंमत वहिनी
ऐक सांगते कानात
ऐक सांगते कानात
आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात
दादाचं घर बाई उन्हात

उगाच करतो खोडी ग,
मलाच म्हणतो वेडी ग
उगाच करतो खोडी ग
मलाच म्हणतो वेडी ग
तुला चिडवितो, मला रडवितो आणिक हसतो गालात
आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात
दादाचं घर बाई उन्हात

खेळ मला ग आणी ना
साडी तुजला देईना
खेळ मला ग आणी ना
साडी तुजला देईना
ऐट दाखवी वरती आणिक सदा तो अपुल्या तोऱ्यात
आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात
दादाचं घर बाई उन्हात

वहिनी का ग हिरमुसली
नकोच का शिक्षा असली
वहिनी का ग हिरमुसली
नकोच का शिक्षा असली शिक्षा असली
फितूर होशिल दादाला फितूर होशिल दादाला
ही शंका येते मनात
आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात
दादाचं घर बाई उन्हात

तुझी नि माझी जंमत वहिनी
तुझी नि माझी जंमत वहिनी
ऐक सांगते कानात
ऐक सांगते कानात
आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात
दादाचं घर बाई उन्हात

Trivia about the song Dadacha Ghar Bai Unhat by Asha Bhosle

Who composed the song “Dadacha Ghar Bai Unhat” by Asha Bhosle?
The song “Dadacha Ghar Bai Unhat” by Asha Bhosle was composed by JAYANT MARATHE, YASHWANT DEO.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock