Devroop Hovoo Sagale

Vasnat Prabhu, P Salvaram

देवरूप होऊ सगळे
देवरूप होऊ सगळे आम्ही एकियाच्या बळे
देवरूप होऊ सगळे
देवरूप होऊ सगळे

सप्तसागराला शक्ती
बिंदु बिंदु मिळता पाणी
सप्तसागराला शक्ती
बिंदु बिंदु मिळता पाणी
एकजीवी अणुरेणूची युगे युगे फिरते धरणी
प्रेमभाव स्वप्नी वचनी
प्रेमभाव स्वप्नी वचनी पांचामुखी ईश्वर बोले
देवरूप होऊ सगळे
देवरूप होऊ सगळे

भूकबळी पक्षी धरता पारध्याने टाकुन जाळे
भूकबळी पक्षी धरता पारध्याने टाकुन जाळे
पंख गुंतवुनी पंखी एकरूप पक्षी झाले
गळ्यामध्ये घालुन गळे
गळ्यामध्ये घालुन गळे मृत्युलाच मारून गेले
देवरूप होऊ सगळे
देवरूप होऊ सगळे

वाढवीत भेदभावा दुष्टतेचा फिरतो कावा
वाढवीत भेदभावा दुष्टतेचा फिरतो कावा
गाठुनिया भोळ्या जीवा अंधारात घालित घावा
चित्त नित्य सावध ठेवा
चित्त नित्य सावध ठेवा एकलक्षी लावुनि डोळे
देवरूप होऊ सगळे
आम्ही एकियाच्या बळे
देवरूप होऊ सगळे
देवरूप होऊ सगळे

Trivia about the song Devroop Hovoo Sagale by Asha Bhosle

Who composed the song “Devroop Hovoo Sagale” by Asha Bhosle?
The song “Devroop Hovoo Sagale” by Asha Bhosle was composed by Vasnat Prabhu, P Salvaram.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock