Dis Jatil Dis Yetil

Sudhir Moghe, Sudhir Phadke

तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं
तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नविन घडंल
घरकुलासंग समदं येगळं होईल
दिस जातील दिस येतील
भोग सरंल सुख येईल
दिस जातील दिस येतील
भोग सरंल सुख येईल

अवकळा समदी जाईल निघूनी
तरारलं बीज तुज माझ्या कुशीतूनी ओ ओ ओ ओ
मिळंल का त्याला उन वारा पानी
राहिल का सुकंल ते तुझ्या माझ्या वानी
रोप आपुलच पर होईल येगळं
रोप आपुलच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं
दिस जातील दिस येतील
भोग सरंल सुख येईल
दिस जातील दिस येतील
भोग सरंल सुख येईल

ढगावानी बरसंल त्यो वार्यावानी हसवंल त्यो
ढगावानी बरसंल त्यो वार्यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखविल काट्यालाबी खेळविल
समद्या दुनियेचं मन रिझविल त्यो ओ ओ
आसंल त्यो कुनावानी
आसंल त्यो कुनावानी कसा गं दिसंल
तुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असंल
दिस जातील दिस येतील
भोग सरंल सुख येईल
दिस जातील दिस येतील
भोग सरंल सुख येईल

उडूनिया जाईल ही आसवांची रात
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहांटच्या दंवावानी तान्हं तुजं-माजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव
दिस जातील दिस येतील
भोग सरंल सुख येईल
दिस जातील दिस येतील
भोग सरंल सुख येईल
दिस जातील दिस येतील
भोग सरंल सुख येईल
दिस जातील दिस येतील
भोग सरंल

Trivia about the song Dis Jatil Dis Yetil by Asha Bhosle

Who composed the song “Dis Jatil Dis Yetil” by Asha Bhosle?
The song “Dis Jatil Dis Yetil” by Asha Bhosle was composed by Sudhir Moghe, Sudhir Phadke.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock