Dohale Purava

Baburao Gokhale, Davjekar Datta

डोहाळे पुरवा मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा
डोहाळे पुरवा
झोपाळा सजवा वेलींनी गर्भवतीला झुलवा
डोहाळे पुरवा
भरुनी चुडा हिरवा हिरवा भरुनी चुडा हिरवा हिरवा
शालूही ल्याले भरजरी हिरवा ग
डोहाळे पुरवा
वेणीमधे मरवा ग मरवा वेणीमधे मरवा मरवा
खोवियला आणवा चाफा हिरवा ग
डोहाळे पुरवा
पहिल्या महिन्याला सुनंस येता थकवा
सासुनी जाणुनी धीर दिला तीज बरवा
तिसर्‍या महिन्याला खण-नारळ अन् वोमी‌
कुणी गर्भवतीची चोर ओटी भरविली
महिन्यात सहाव्या थकलं ग पाऊल
सासर्‍यास लागंल कान्‍ह्याची चाहूल
बघा बघा लाजतेय कशी पहिलीच खेप आहेनं हि
पहिलीच खेप ही जाणवोनी मुळी देवा
लाजर्‍या वेलीला नकळत बहरही यावा
नववा भरुनिया नववा भरुनिया
मुलगीच ग व्हावी
व्हावी ती झाशीची राणी
नववा भरुनिया पुत्र पोटी यावा
भारती जवाहीर व्हावा
भारती जवाहीर व्हावा
भारती जवाहीर व्हावा

Trivia about the song Dohale Purava by Asha Bhosle

Who composed the song “Dohale Purava” by Asha Bhosle?
The song “Dohale Purava” by Asha Bhosle was composed by Baburao Gokhale, Davjekar Datta.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock