Kali Kali Umalte

Madhusuadn Kalelkar, Kadam Ram

आ आ आ कळी कळी उमलते पाकळी फुलुनी ये आनंद
आनंदाच्या लहरी वरती जीव नाचतो धुंद
नाचतो नाचतो जीव नाचतो धुंद

एक अनोखी आली चाहूल भूमिवरचे सुटले पाऊल
स्वैर भरारे प्राण अंबरे
स्वैर भरारे प्राण अंबरे तोडुन सारे बंध
हां हां तोडुन सारे बंध
हां हां आनंदाच्या लहरी वरती जीव नाचतो धुंद

उरी जागते नव संवेदन कंप सुखाचे अंगअंगातुन
हृदयाचे राजीव उमलले
हृदयाचे राजीव उमलले टपटपतो मकरंद
हां हां हां टपटपतो मकरंद
हां हां आनंदाच्या लहरी वरती जीव नाचतो धुंद

उगीच लाजते उगीच रुसते मी माझ्याशी उगीच हसते
न कळे बाई काय खुळा हा
न कळे बाई काय खुळा हा मला लागला छंद
हां हां हां मला लागला छंद
हां हां आनंदाच्या लहरी वरती जीव नाचतो धुंद
कळी कळी उमलते पाकळी फुलुनी ये आनंद
आनंदाच्या लहरी वरती जीव नाचतो धुंद

Trivia about the song Kali Kali Umalte by Asha Bhosle

Who composed the song “Kali Kali Umalte” by Asha Bhosle?
The song “Kali Kali Umalte” by Asha Bhosle was composed by Madhusuadn Kalelkar, Kadam Ram.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock