Kevha Tari Pahate

Suresh Bhat

केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे
उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे
हरवून रात गेली
मिटले मिटले मिटले चुकून डोळे

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे
वय कोवळे उन्हाचे सांगू तरी कसे मी
वय कोवळे उन्हाचे वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा उसवून श्वास माझा
फसवून रात गेली उसवून श्वास माझा

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा
कळले मला न केव्हा निसटून रात गेली
कळले कळले कळले मला न केव्हा

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे
उरले उरात काही आवाज चांदण्यांचे
आकाश तारकांचे उचलून रात गेली
आकाश तारकांचे उचलून रात गेली
आकाश तारकांचे

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची
मग ओळ शेवटाची
सुचवून रात गेली
केव्हा तरी पहाटे
उलटून रात गेली
मिटले मिटले मिटले चुकून डोळे
हरवून रात गेली

Trivia about the song Kevha Tari Pahate by Asha Bhosle

Who composed the song “Kevha Tari Pahate” by Asha Bhosle?
The song “Kevha Tari Pahate” by Asha Bhosle was composed by Suresh Bhat.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock