Mee Maj Harpun Basale Ga
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
सखी मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन
आज पहाटे श्रीरंगाने आज पहाटे
आ आ आ आ आ आ
आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले गं
साखरझोपेमधेच अलगद
साखरझोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले गं
मी मज हरपुन
त्या श्वासांनी दीपकळीगत
त्या श्वासांनी दीपकळीगत
पळभर मी थरथरले गं
त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर
त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर लाजत उमलत झुलले गं
मी मज हरपुन
त्या नभशामल मिठीत नकळत
त्या नभशामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले गं
दिसला मग तो
दिसला मग तो देवकीनंदन अन मी डोळे मिटले गं
मी मज हरपुन
आ आ आ आ आ आ
मी मज हरपुन