Preeticha Nav Vasant

Shukla, Snehal Bhatkar

प्रीतीचा नव वसंत फुलला
प्रीतीचा नव वसंत फुलला हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा बाग दिलाचा दरवळला
प्रीतीचा नव वसंत फुलला

पुरे प्रीतीचा छंद चाळा
पुरे प्रीतीचा छंद चाळा जगावेगळा हा असला
जगावेगळा हा असला
नाजुक साजुक गोजिरवाणी किती ग भोळी तू फुलराणी
प्रणय साज शृंगार साजणी अंगारच जणू रसरसला
प्रीतीचा नव वसंत फुलला

प्रियकर मधुकर धावुन येईल
प्रियकर मधुकर धावुन येईल रसिकराज मधुरुंजी घालिल
मंजुळ गुंजनि मंजुळ गुंजनि सदा रंगविल
ह्या हसऱ्या फुलराणीला
प्रीतीचा नव वसंत फुलला

कुटिल भृंग रंगेल वृत्तीचा लुटिल नवरसरंग नवतीचा
कुटिल भृंग रंगेल वृत्तीचा लुटिल नवरसरंग नवतीचा
वंचिल चंचल निष्ठुर साचा लोटिल विरहानली कलिकेला
प्रीतीचा नव वसंत फुलला

प्रेमळ कमळण चतुर धूर्तही
प्रेमळ कमळण चतुर धूर्तही भृंगसख्याला कोंडिल हृदयी
सहजच तो मग अंकित होईल जिंकित प्रेम जगाला
प्रीतीचा नव वसंत फुलला
प्रीतीचा नव वसंत फुलला हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा बाग दिलाचा दरवळला
प्रीतीचा नव वसंत फुलला
प्रीतीचा नव वसंत फुलला

Trivia about the song Preeticha Nav Vasant by Asha Bhosle

Who composed the song “Preeticha Nav Vasant” by Asha Bhosle?
The song “Preeticha Nav Vasant” by Asha Bhosle was composed by Shukla, Snehal Bhatkar.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock