Raat Chandani

Madhusudan Kalelkar, Sudhir Phadke

रात चांदणी गंध चंदनी
रात चांदणी गंध चंदनी
आज लोचनी हवास तू हवास तू
रात चांदणी गंध चंदनी
आज लोचनी हवीस तू हवीस तू

नकोस पाहू नकोस ऐकू प्रीतिचे हितगूज फुला
नयन बोलु दे नयन ऐकु दे आळवु दे अनुराग मला
धुंद छेडुनी विरहरागिणी सूर बंधनी हवास तू
हवास तू हवास तू

सहज बोलले उगीच हसले आणि विसरले मीच मला
काही न कळले अंतर सरले जीव अचानक मोहरला
लाज लाजुनी एक चांदणी बोलली मनी हवास तू
हवास तू हवास तू

मिटुन पापणी घेता सजणी जाणवते का जाग उरी
चंद्र दर्पणी तुला पाहुनी लाज कशाला या अधरी
स्वप्‍न मीलनी चित्त कोंदणी आज चिंतनी हवास तू
हवास तू हवास तू
रात चांदणी गंध चंदनी
आज लोचनी हवास तू हवीस तू
हवास तू हवीस तू

Trivia about the song Raat Chandani by Asha Bhosle

Who composed the song “Raat Chandani” by Asha Bhosle?
The song “Raat Chandani” by Asha Bhosle was composed by Madhusudan Kalelkar, Sudhir Phadke.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock