Sadhi Bholi Meera

Jagdish Khebudkar, N Datta

अरे मनमोहना
अरे मनमोहना
कळली देवा तुला राधिका रे राधिका
कळली राधिका रे कळल्या गोपिका
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना
ओ कळली देवा तुला राधिका रे राधिका रे राधिका
कळली राधिका रे कळल्या गोपिका कळल्या गोपिका
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना आ आ

ओ ओ ओ ओ ओ ओ

सात सुरांवर तन-मन नाचे
तालावरती मधुबन नाचे ओ ओ
सात सुरांवर तन-मन नाचे
तालावरती मधुबन नाचे
एक अबोली होती फुलली
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना आ आ

ओ ओ ओ
ओ ओ ओ

धुंद सुगंधी यमुना लहरी
उजळून आली गोकुळ नगरी
हा हा ओ ओ ओ ओ हा हा
धुंद सुगंधी यमुना लहरी
उजळून आली गोकुळ नगरी
जीवन माझे अंधाराचे
जीवन माझे अंधाराचे
काळी काळी रात कधी टळली नाही
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना

ओ ओ ओ ओ ओ ओ

उन्हात काया मनात छाया
कशी समजावू वेडी माया ओ ओ
उन्हात काया मनात छाया
कशी समजावू वेडी माया
युग युग सरले डोळे भरले
युग युग सरले डोळे भरले
आशेची कळी कधी फुलली नाही
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना
ओ कळली देवा तुला राधिका रे राधिका राधिका रे राधिका
कळली राधिका रे कळल्या गोपिका कळल्या गोपिका
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना आ आ

Trivia about the song Sadhi Bholi Meera by Asha Bhosle

Who composed the song “Sadhi Bholi Meera” by Asha Bhosle?
The song “Sadhi Bholi Meera” by Asha Bhosle was composed by Jagdish Khebudkar, N Datta.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock