Sahaj Sakhya Ekdach

Shrinivas Khale, Suryakant Khandekar, Anil Mohile

सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी
वाट तुझी पाहीन त्या
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी

हिरवळीत गीत गात, सांजरंगि न्हात न्हात
हिरवळीत गीत गात, सांजरंगि न्हात न्हात
स्वप्नांना रंगवुया
स्वप्नांना रंगवुया लेवुनिया लाली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी

अधरी जे अडत असे, सांगीन तुज गूज असे
अधरी जे अडत असे, सांगीन तुज गूज असे
प्रीती ही प्रीतीविण
प्रीती ही प्रीतीविण अजुनही अबोली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी

तृणपुष्पे मोहक ती उमलतील एकांती
तृणपुष्पे मोहक ती उमलतील एकांती
चांदण्यात उमलवुया
चांदण्यात उमलवुया प्रीत भावभोळी
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी

Trivia about the song Sahaj Sakhya Ekdach by Asha Bhosle

Who composed the song “Sahaj Sakhya Ekdach” by Asha Bhosle?
The song “Sahaj Sakhya Ekdach” by Asha Bhosle was composed by Shrinivas Khale, Suryakant Khandekar, Anil Mohile.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock