Samaichya Shubhra Kalya
समईच्या शुभ्र कळ्या
समईच्या शुभ्र कळ्या
उमलवून लवते
केसांतच फुललेली
जाई पायांशी पडते
समईच्या शुभ्र कळ्या
भिवयांच्या फडफडी
दिठीच्याही मागे पुढे
भिवयांच्या फडफडी
दिठीच्याही मागे पुढे
मागे मागे राहिलेले
माझे माहेर बापुडे
समईच्या शुभ्र कळ्या
उमलवून लवते
समईच्या शुभ्र कळ्या
साचणाऱ्या आसवांना
पेंग येते चांदणीची
साचणाऱ्या आसवांना
पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे
विसराळू मुलखाची
समईच्या शुभ्र कळ्या
उमलवून लवते
समईच्या शुभ्र कळ्या
थोडी फुले माळू नये
डोळां पाणी लावू नये
थोडी फुले माळू नये
डोळां पाणी लावू नये
पदराच्या किनारीला
शिवू शिवू ऊन ग ये
समईच्या शुभ्र कळ्या
उमलवून लवते
समईच्या शुभ्र कळ्या
हांसशील हांस मला
मला हांसूही सोसेना
हांसशील हांस मला
मला हांसूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल
चंद्र होणार का दुणा
समईच्या शुभ्र कळ्या
उमलवून लवते
केसांतच फुललेली
जाई पायांशी पडते
समईच्या शुभ्र कळ्या