Yene Jane Ka Ho Sodale

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

येणे-जाणे का हो सोडले
येणे-जाणे का हो सोडले तोडले नाते
पहिल्यावाणी येत जा सख्य़ा शपथ घालते
शपथ घालते शपथ घालते
येणे-जाणे का हो सोडले

सासरच्या घरी तुम्हास नसे अटकाव
अटकाव नसे अटकाव
लागु नाही दिला कोणा मी मनाचा ठाव
बाई ठाव मनाचा ठाव
मानिती मला मामंजी मानतो गाव मानतो गाव
चालते खालती बघुन जपून बोलते
पहिल्यावाणी येत जा सख्य़ा शपथ घालते
शपथ घालते शपथ घालते
का येणे-जाणे का हो सोडले

ध्यानात पुन्यांदा येतो परताचा सोपा
परताचा सोपा
माहेरच्या मळ्यातील सांज हळदीचा वाफा
हळदीचा वाफा
ओसाड जुने देऊळ पांढरा चाफा
पांढरा चाफा बाई चाफा
तुझ्यापाशी आज जिवलगा उघड बोलते
पहिल्यावाणी येत जा सख्य़ा शपथ घालते
शपथ घालते शपथ घालते
का येणे-जाणे का हो सोडले
येणे-जाणे का हो सोडले

Trivia about the song Yene Jane Ka Ho Sodale by Asha Bhosle

Who composed the song “Yene Jane Ka Ho Sodale” by Asha Bhosle?
The song “Yene Jane Ka Ho Sodale” by Asha Bhosle was composed by G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock