Ka Zurate Vedi
GURUNATH SHENAI, RANJANA PRADHAN
का झुरते वेडी तुझीच ही मधुराणी
का झुरते वेडी तुझीच ही मधुराणी
ते सांगेन तुजला चैत्र फुलांच्या रानी
का झुरते वेडी तुझीच ही मधुराणी
तुज कळेल केव्हा ओढ मनाची माझ्या
तुज कळेल केव्हा ओढ मनाची माझ्या
मी तुला मानिले मम हृदयाचा राजा
ती कथा अकल्पित घडली एक दिवाणी
ते सांगेन तुजला चैत्र फुलांच्या रानी
का झुरते वेडी तुझीच ही मधुराणी
हे स्वरसंवादी प्रेम दिव्य बहराचे
हे स्वरसंवादी प्रेम दिव्य बहराचे
ते नकळत करते अमृत की जहराचे
विलसती मनातून गुलमोहर उद्यानी
ते सांगेन तुजला चैत्र फुलांच्या रानी
का झुरते वेडी तुझीच ही मधुराणी
ते सांगेन तुजला चैत्र फुलांच्या रानी
का झुरते वेडी तुझीच ही मधुराणी