जीव भुलला [Original]

Guru Thakur

जीव भुलला, रुणझुणला
ओ जीव भुलला, रुणझुणला
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला

ओ क्षण हळवा गुणगुणला
क्षण हळवा गुणगुणला
बावऱ्या या क्षणात श्वास हा गंधाळला (अहाहा… लालाला…)

सूर हे छेडती, स्पंदने वेडी कोणती
बोलके होती स्पर्श सारे हे इशारे बोलती
हो हो सूर हे छेडती, स्पंदने वेडी कोणती
बोलके होती स्पर्श सारे हे इशारे बोलती
भावनांचे शब्द व्हावे, गीत ओठी मोहरावे
हरपुनी हे भान जावे, ये जरा

ना न ना ना न ना ना न ना ना न ना

क्षण हळवा गुणगुणला
ओ क्षण हळवा गुणगुणला
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला

ओ दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती
हो दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती
प्रेमरंगी मी भिजावे ते तुला ही जाणवावे
पांघरावे मी तुला ये अन् जरा

ना न ना ना न ना ना न ना ना न ना

जीव झुरला, तळमळला
हो क्षण हळवा दरवळला
बावऱ्या या क्षणात श्वास हा गंधाळला

Trivia about the song जीव भुलला [Original] by Shreya Ghoshal

Who composed the song “जीव भुलला [Original]” by Shreya Ghoshal?
The song “जीव भुलला [Original]” by Shreya Ghoshal was composed by Guru Thakur.

Most popular songs of Shreya Ghoshal

Other artists of Indie rock