Man Raanat Gela

AJAY GOGAVALE, ATUL GOGAVALE, SANJAY PATIL

मन रानात गेलं ग गेल ग गेल ग
पानापानांत गेलं ग गेल ग गेल ग
मन रानात गेलं ग पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात अंब्याच्या पाडात गेलं ग

हे मन रानात गेलं ग गेल ग गेल ग
पानापानांत गेलं ग गेल ग गेल ग
मन रानात गेलं ग पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात अंब्याच्या पाडात गेलं ग

बिल्लोरी खिल्लोरी सांज सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
हे लबाड या तार्‍याला थांब थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग
हे भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
हे थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
हे भानात रानात धुंद धुंद झालं मन
रानात गेलं ग

मन रानात गेलं ग पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात अंब्याच्या पाडात गेलं ग

हे सर्राट ह्या आभाळी उंच उंच जाऊ ग
वार्‍याचं पंख होऊ ग
हे थर्राट पाण्यामंदी चिंब चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
हे शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
पानाची साद देती ग
हे सरसरल्यावानी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
हे भानात रानात हे धुंद धुंद झालं मन
रानात गेलं ग पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात अंब्याच्या पाडात गेलं ग

हो मन रानात गेलं ग पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात अंब्याच्या पाडात गेलं ग

Trivia about the song Man Raanat Gela by Shreya Ghoshal

Who composed the song “Man Raanat Gela” by Shreya Ghoshal?
The song “Man Raanat Gela” by Shreya Ghoshal was composed by AJAY GOGAVALE, ATUL GOGAVALE, SANJAY PATIL.

Most popular songs of Shreya Ghoshal

Other artists of Indie rock