Bale Ghatavari
तुळजा गडावरी गडावरी गं तुझा वास
भक्त येतील दर्शनास
भक्त येतील दर्शनास
बाले घाटावरी घाटावरी गं तुझा वास
भक्त येतील दर्शनास
भक्त येतील दर्शनास
पिवळ पातळ गं पातळ बुट्टेदार
अंगी चोळी न हिरवीगार
पितंबराची गं बराची खोवून खास
भक्त येतील दर्शनास
भक्त येतील दर्शनास
बिंदी बीजवरा बीजवरा गं भाळी शोभे
आप वळ्यानवेल झुपके
पट्टा सोनेरी गं सोनेरी कमरेला
भक्त येतील दर्शनाला
भक्त येतील दर्शनाला
सरी ढोसीन गं ढोसीन मोहनमाळ
जोडी मासोळ्या पैंजण चाळ
हिच्या नथेला गं नथेला हिरे खोस
भक्त येतील दर्शनास
भक्त येतील दर्शनास
जाई जुईची गं जुईची आणीली फुले
भक्त गुंफिती हार तुरे
हार घालीते गं घालीते अंबिकेला
भक्त येतील दर्शनाला
भक्त येतील दर्शनाला
पुरणपोळी ग पोळी भोजनाला
मुखी तांबूल देते तुला
ओटी भरीते ग भरिते नारळाची
भक्त येतील दर्शनासी
भक्त येतील दर्शनासी
माझ्या मनाची ग मनाची मानसपूजा
त्रिनी अर्पिते अष्टभुजा
मनभावेन ग भावेन पुजते तुला
भक्त येतील दर्शनाला
भक्त येतील दर्शनाला
तुळजा गडावरी गडावरी गं तुझा वास
भक्त येतील दर्शनास
भक्त येतील दर्शनास
बाले घाटावरी घाटावरी गं तुझा वास
भक्त येतील दर्शनास
भक्त येतील दर्शनास