Tap Tap Padti

Mangesh Padgaonkar

टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे
भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

कुरणावरती झाडांखाली
ऊनसावली विणते जाळी
कुरणावरती झाडांखाली
ऊनसावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा गवत खुशीने डुले
येतो वारा पाहा भरारा गवत खुशीने डुले
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

दुर दुर हे सूर वाहती
उनहात पिवळया पाहा नाहती
दुर दुर हे सूर वाहती
उनहात पिवळया पाहा नाहती
हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले
हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

गाणे अमुचे झुळ झुळ वारा
गाणे अमुचे लुक लुक तारा
गाणे अमुचे झुळ झुळ वारा
गाणे अमुचे लुक लुक तारा
पाऊसधारा मोरिपसारा या गाणयातुन फुले
पाऊसधारा मोरिपसारा या गाणयातुन फुले
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सुर चला रे
फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सुर चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे
भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे
भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे
भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे

Most popular songs of केतकी माटेगावकर

Other artists of Film score