Andaaz Aarshacha Wate Khara

BHIMRAO PANCHALE, ILAHI JAMADAR

आ आ आ आ आ आ
गीत गुंजरते जीवनाचे गजल
गीत गुंजरते जीवनाचे गजल
मर्म हृदयातल्या स्पंदनाचे गजल
भावनेला मुक्या बोलवेना जिथे
नेमकी वेदना तीच वाचे गजल
रसिक मित्रहो आदाब
भावनाची अभिव्यक्ती ही
मानवी मनाची नितांत गरज आहे
आणि अभिव्यकीच एक सशक्त माध्यम गजल
गजल म्हणजे एक तत्त्वज्ञान एक जीवनशैली
गजलचा दोन ओळींचा शेर
म्हणजे जीवनाची एक एक चव एक एक प्रत्यय
अशी ही गजल आपल्या खास शैलीत
स्वरांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत
पोहोचवण्याचा श्रेय आहे गजल नवाझ
भिमराव पांचाळे यांना भीमरावांच्या गायनात
भावनेचा ओलावा घेऊन स्वर शब्दांना भेटतात
शब्दांतील आशय बोलका होतो
रसिकांशी संवाद साधला जातो
आणि त्यातूनच साकारते एक जखम सुगंधी

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकांतून पाहिलेली माणसे गेली कुठे
रोज अत्याचार होतो रोज अत्याचार होतो
आरश्यावरती आता आरश्याला भावलेली
माणसे गेली कुठे अंदाज
आरशाचा वाटे खरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा बहुतेक माणसाचा
तो चेहरा असावा अंदाज
आरशाचा वाटे खरा असावा
अंदाज

काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
काठावरी उतरली उतरली
काठावरी उतरली
स्वप्ने तहानलेली डोळ्यांत वेदनेचा
डोळ्यांत वेदनेचा माझ्या झरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
अंदाज

जख्मा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
जख्मा कशा सुगंधी
जख्मा जख्मा जख्मा जख्मा
जख्मा कशा सुगंधी
झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
अंदाज

माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही
माथ्यावरी नभाचे माथ्यावरी माथ्यावरी नभाचे
ओझे सदा इलाही
सा ग मा प ग मा प सा नी सा ग मा प प मा ग मा प नि सा सा ग रे
नि सा ध प नि मा प ग ग मा प नि सा ग मा प नि सा ग मा प नि
माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही दाही दिशा
कशाच्या कशाच्या दाही दिशा कशाच्या
हा पिंजरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा बहुतेक माणसाचा
तो चेहरा असावा
अंदाज अंदाज अंदाज

Most popular songs of भीमराव पांचाळे

Other artists of Traditional music