Sharayu Teeravari Ayodhya

Sudhir Phadke, G D Madgulkar

श्री रामाच्या यज्ञ मंडपात तपस्वि धारण केलेल्या
कुसळावंच रामचरित्र गायन सुरु झालं
प्रसंगामागून प्रसंग ते वर्णूं सांगताहेत
आपल्या प्राणाच्या सर्वशक्तीकरणाच्या ठायी
एकवटून श्रोतेजन ऐकताहेत आणि
सुवर्ण सिहासनावर बसून प्रत्यक्ष श्रीराम ऐकताहेत

सरयू तीरावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
सरयू तीरावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
मधुन वाहती मार्ग समांतर
रथ वाजी गज पथिक चालती नटुनी त्यांच्यावरी
हो नटुनी त्यांच्यावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

घराघरावर रत्नतोरणें
अवतीभंवती रम्य उपवने
त्यांत रंगती नृत्य गायनें
त्यांत रंगती नृत्य गायनें
मृदंग वीणा नित्य नादती अलका नगरीपरी
हो अलका नगरीपरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

स्त्रीया पतिव्रता पुरुषहि धार्मिक
पुत्र उपजती निजकुल दीपक
नृशंस ना कुणि कुणि ना नास्तिक
अतृप्तीचा कुठें न वावर नगरिं घरी अंतरीं
हो नगरिं घरी अंतरीं
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

इक्ष्वाकू कुल कीर्तीभूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचे करितो रक्षण
त्या नगरीचे करितो रक्षण
गृहीं चंद्रसा नगरिं इंद्रसा गृहीं चंद्रसा नगरिं इंद्रसा सूर्य जसा संगरी
हो सूर्य जसा संगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रूपशालिनी अतुलप्रभा सुंदरी
हो अतुलप्रभा सुंदरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

तिघी स्त्रीयांच्या प्रीतिसंगमीं
तिन्ही लोकिंचें सुख ये धामीं
तिघी स्त्रीयांच्या प्रीतिसंगमीं
तिन्ही लोकिंचें सुख ये धामीं
एक उणें पण गृहस्थाश्रमी
एक उणें पण गृहस्थाश्रमी
पुत्रोदय पण अजुनी नव्हता प्रीतीच्या अंबरी
हो प्रीतीच्या अंबरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

शल्य एक तें कौसल्येसी
दिसे सुमित्रा सदा उदासी
कैक कैकयी करी नवसासी
कैक कैकयी करी नवसासी
दशरथधासही व्यथा एक ती छळिते अभ्यंतरी
हो छळिते अभ्यंतरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

राजसौख्य तें सौख्य जनांचे
एकद्च चिंतन लक्ष मनांचे
राजसौख्य तें सौख्य जनांचे
एकच चिंतन लक्ष मनांचे
काय काज या सोख्य धनार्चे
कल्पतरुला फुल नसे का
कल्पतरुला फुल नसे का
वसंत सरला तरी
हो वसंत सरला तरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

Trivia about the song Sharayu Teeravari Ayodhya by सुधीर फडके

When was the song “Sharayu Teeravari Ayodhya” released by सुधीर फडके?
The song Sharayu Teeravari Ayodhya was released in 2004, on the album “Sharayu Teeravari Ayodhya”.
Who composed the song “Sharayu Teeravari Ayodhya” by सुधीर फडके?
The song “Sharayu Teeravari Ayodhya” by सुधीर फडके was composed by Sudhir Phadke, G D Madgulkar.

Most popular songs of सुधीर फडके

Other artists of