Aarti Dattachi
त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रयलोक्यराणा
नेति नेति शब्द नये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचित्ता
जय देव जय देव
सबाह्य अभ्यंतरी तु एक दत्त
अभाग्यासी कैची कळेल ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्ममरणाचा पुरलासे अंत
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचित्ता
जय देव जय देव
दत्त येऊनीया उभा ठाकला
सदभावे साष्टांगे प्रणिपात केला
प्रसन्न होऊनीया आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचित्ता
जय देव जय देव
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी तू पणाची झाली बोलवण
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचित्ता
जय देव जय देव