Avchita Parimaku

आ आ आ आ
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू
मी ह्यणु गोपाळू आला गे माये
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू

चांचरती चांचरती बाहेरी निघाले
चांचरती चांचरती बाहेरी निघाले
ठकचि मी ठेले काय करू
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू

तो सावळा सुंदरू कांसे पीतांबरू
तो सावळा सुंदरू कांसे पीतांबरू
लावण्य मनोहुरू देखियेला
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू

बोध्रुनी ठेले मन तव जालें आन
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू

बाप रखुमादेवीवरू विठठल सुखाचा
बाप रखुमादेवीवरू विठठल सुखाचा
विठठल सुखाचा विठठल सुखाचा
तेणें काया मने वाचा वेधियेलें
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू
मी ह्यणु गोपाळू आला गे माये
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score