Bandini
आपल्या पुरुष प्रधान संस्कृतित स्त्रीला नियमित दुय्यम स्थान मिडताल अहेत
स्वतंत्र अस तिला कधि मिळतच नाही
ती बिचारि कायम ची बंदिनी
शांताराम नांदगावकर यांचा या गीताला
सुरेख हृदयस्पर्शी चाल बांधली आहे अरुण पौडवालियानी
आनी गात आहेत अनुराधा पौडवाल
आ आ आ
बंदिनी स्त्री ही बंदिनी
हृदयी पान्हा नयनी पाणी
हृदयी पान्हा नयनी पाणी
जन्मोजन्मींची कहाणी
हृदयी पान्हा नयनी पाणी
बंदिनी स्त्री ही बंदिनी
आ आ आ
रूप बहिणीचे माया देई
वात्सल्य मूर्त आई होई
रूप बहिणीचे माया देई
वात्सल्य मूर्त आई होई
माहेरा सोडून येई
माहेरा सोडून येई
सासरी सर्वस्व देई
हृदयी पान्हा नयनी पाणी
जन्मोजन्मींची कहाणी
हृदयी पान्हा नयनी पाणी
बंदिनी स्त्री ही बंदिनी
ओ ओ ओ
ओ ओ ओ
कधी सीता कधी होई कुंती
सावित्रीची दिव्य शक्ति
कधी सीता कधी होई कुंती
सावित्रीची दिव्य शक्ति
शकुंतला तूच होसी
शकुंतला तूच होसी
मीरा ही प्रीत दिवाणी
हृदयी पान्हा नयनी पाणी
जन्मोजन्मींची कहाणी
हृदयी पान्हा नयनी पाणी
बंदिनी स्त्री ही बंदिनी
युगेयुगे भावनांचे धागे
जपावया मन तुझे जागे
युगेयुगे भावनांचे धागे
जपावया मन तुझे जागे
बंधनें ही रेशमाची
बंधनें ही रेशमाची
सांभाळी स्त्रीच मानिनी
हृदयी पान्हा नयनी पाणी
जन्मोजन्मींची कहाणी
हृदयी पान्हा नयनी पाणी
बंदिनी स्त्री ही बंदिनी
बंदिनी बंदिनी