Gananayaka Shubhadayaka

Vasant Bapat

गणनायका
गणनायका शुभदायका
यावे तुम्ही गिरीकंदरा
सह्याद्रीच्या हृदयामध्ये
लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका

शिवनेरीच्या शिवशंभूचा
सहवास पावन लाभला
उकडीतीरी तव मंदिरी
हा पुण्यसंचय हा भला
गिरीजात्मजा
गिरीजात्मजा तव मूर्ती ही
सिंदूरचर्चित सुंदरा गणनायका

तोडूनिया भवपाश हे
भवकाळ या गुंफातुनी
तपी बैसले बहु कष्टले
का व्यर्थ ते योगीमुनी
भक्ती तुझी
भक्ती तुझी सुखदायिनी
तप का उगा मग आचरा गणनायका
गणनायका शुभदायका
यावे तुम्ही गिरीकंदरा
सह्याद्रीच्या हृदयामध्ये
लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका

Trivia about the song Gananayaka Shubhadayaka by Anuradha Paudwal

Who composed the song “Gananayaka Shubhadayaka” by Anuradha Paudwal?
The song “Gananayaka Shubhadayaka” by Anuradha Paudwal was composed by Vasant Bapat.

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score