Hasle Fasle

Jagadish Khebudakar

हसले फसले हरवून मला मी बसले
हसले फसले हरवून मला मी बसले
हरवून मला मी बसले

कळी मी अबोल होते वारा लबाड आला
कळी मी अबोल होते वारा लबाड आला
मी अंग चोरीले ग
मी अंग चोरीले ग हळुवार स्पर्श झाला
हळुवार स्पर्श झाला क्षण ते दंवात भिजले
हसले फसले हरवून मला मी बसले
हरवून मला मी बसले

देठातुनी फुलावे हितगूज एक ओले
देठातुनी फुलावे हितगूज एक ओले
कुजबूज पाकळ्यांची गंधास रंग बोले
सारे मनात ठसले
हसले फसले हरवून मला मी बसले
हरवून मला मी बसले

वेलीवरी धुक्याचा उठता नवा शहारा
वेलीवरी धुक्याचा उठता नवा शहारा
स्वप्‍नात जागले मी छेडीत चंद्रतारा
स्वर ते अबोध कसले
हसले फसले हरवून मला मी बसले
हरवून मला मी बसले

ओशाळल्या मनाला जाणीव आज लाजे
ओशाळल्या मनाला जाणीव आज लाजे
मजला मिळून सारे काही न आज माझे
मजला मिळून सारे काही न आज माझे
म्हणुनी उगाच रुसले
हसले फसले हरवून मला मी बसले
हसले फसले हरवून मला मी बसले
हरवून मला मी बसले
हरवून मला मी बसले

Trivia about the song Hasle Fasle by Anuradha Paudwal

Who composed the song “Hasle Fasle” by Anuradha Paudwal?
The song “Hasle Fasle” by Anuradha Paudwal was composed by Jagadish Khebudakar.

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score