Sasa to Sasa

Shantaram Nandagavakar

चपळतेने तुरुतुरु धावणारा ससा
आणि हळू हळू चालणारा कासव
यांच्या शर्यतीची कथा असणारी हि
इसापनीती मधली गोष्ट
शांताराम नांदगावकरांनी आपल्या
छोट्या छोट्या दोस्ताना समजेल
अश्या सोप्या भाषेत गेय पद्धतीने
अंकित केली आहे आणि त्याला
तशीच अर्थपूर्ण आणि कौशल्यपूर्ण
गोड चाल दिली आहे अरुण पौडवाल यांनी
आता आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत
अनुराधा पौडवाल
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहिले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटूलुटू पाही
ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे
ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळा मनी होई
निजला तो संपला सांगे
ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
ही शर्यत रे अपुली
ही शर्यत रे अपुली

Trivia about the song Sasa to Sasa by Anuradha Paudwal

Who composed the song “Sasa to Sasa” by Anuradha Paudwal?
The song “Sasa to Sasa” by Anuradha Paudwal was composed by Shantaram Nandagavakar.

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score