Tinhi Sanjela Prabhu Charnashi

Pravin Davne

तिन्हिसांजेला प्रभुचरणाशी एक नित्य प्रार्थना
तिन्हिसांजेला प्रभुचरणाशी एक नित्य प्रार्थना
तिमिर जळू दे ज्योत उजळु दे
तिमिर जळू दे ज्योत उजळु दे हीच मनोकामना हीच मनोकामना
तिन्हिसांजेला प्रभुचरणाशी एक नित्य प्रार्थना

ओलांडून हा सोनउंबरा लक्षुमी आली घरी
सरस्वतीचा हात धरुनी तिला पूजुया उरी
सौभाग्याचे अभंग लेणे
सौभाग्याचे अभंग लेणे जपु या कुंकुंमखुणा जपु या कुंकुंमखुणा
तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना

वत्‍सलतेचा गहिवर जेथे स्पर्श प्रभूचा तेथे
‍होऊन मुरली घन:श्यामाची गोकुळनगरी गाते
तोच फुलांना जागविणारा
तोच फुलांना जागविणारा विश्वाची प्रेरणा विश्वाची प्रेरणा
तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना

वाळवंटी ही कृष्णकमलिनी होऊन मीरा झुरते
ठायी ठायी रूप तयाचे ध्यानामधुनी दिसते
जन्‍म होऊ द्या नृत्य हरीचे
जन्‍म होऊ द्या नृत्य हरीचे मंगलमय चेतना मंगलमय चेतना
तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना
तिमिर जळू दे ज्योत उजळु दे
तिमिर जळू दे ज्योत उजळु दे हीच मनोकामना हीच मनोकामना
तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना

Trivia about the song Tinhi Sanjela Prabhu Charnashi by Anuradha Paudwal

Who composed the song “Tinhi Sanjela Prabhu Charnashi” by Anuradha Paudwal?
The song “Tinhi Sanjela Prabhu Charnashi” by Anuradha Paudwal was composed by Pravin Davne.

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score