Utha Utha Ho Sakaljan

उठा उठा सकल जन वाचे स्मरावा गजानन
गौरी हराचा नंदन गजवदन गणपती
उठा उठा सकल जन

ध्यानि आणुनी सुखमूर्ती स्तवन करा एके चित्ती
तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ
उठा उठा सकल जन

जो निजभक्तांचा दाता वंद्य सुरवरां समस्तां
त्यासी गाता भवभ विघनवार्ता निवारी
उठा उठा सकल जन

तो हा सुखाचा सागर श्री गणराज मोरेश्वर
भावे विनवितो गिरीधर भक्त त्याचा होउनी
उठा उठा सकल जन वाचे स्मरावा गजानन
गौरी हराचा नंदन गजवदन गणपती
उठा उठा सकल जन

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score