Vitthal Giti Gava

Santa Tukaram

विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा
विठ्ठल उभा पहावा
विठ्ठल उभा पहावा विटेवरी
विठ्ठल उभा पहावा विटेवरी
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा

अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु
अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु
तोडी भवबंधु यमपाश
तोडी भवबंधु यमपाश
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा

तोचि शरणांगतां विठ्ठल मुक्तिदाता
तोचि शरणांगतां विठ्ठल मुक्तिदाता
विठ्ठल या संतांसमागमें
विठ्ठल या संतांसमागमें
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा

विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि
लागली समाधि विठ्ठल नामें
लागली समाधि विठ्ठल नामें
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा

विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख
विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख
गोडावलें मुख तुका म्हणे
गोडावलें मुख तुका म्हणे
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा
विठ्ठल उभा पहावा
विठ्ठल उभा पहावा विटेवरी
विठ्ठल उभा पहावा विटेवरी
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा

Trivia about the song Vitthal Giti Gava by Anuradha Paudwal

Who composed the song “Vitthal Giti Gava” by Anuradha Paudwal?
The song “Vitthal Giti Gava” by Anuradha Paudwal was composed by Santa Tukaram.

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score