Sampale Jeevan Sampali Hi Gatha

Madhusudan Kalelkar, Kadam Ram

संपले जीवन संपली ही गाथा
तुझ्या पायथ्याला विसावला माथा
विसावला माथा संपले जीवन
उधळला डाव माझा मीच हाती
उधळला डाव माझा मीच हाती
धावलो उगाच मृगजळापाठी
धावलो उगाच मृगजळापाठी
उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा देवा
उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा
तुझ्या पायथ्याला विसावला माथा
विसावला माथा संपले जीवन

चुकलो माकलो नको राग देवा
चुकलो माकलो नको राग देवा
लेकरू अजाण तूच हात द्यावा
लेकरू अजाण तूच हात द्यावा
पडो देह माझा तुझे गुण गाता देवा
पडो देह माझा तुझे गुण गाता
तुझ्या पायथ्याला विसावला माथा
विसावला माथा संपले जीवन

नको जिणे झाले मिटू दे हे पान
नको जिणे झाले मिटू दे हे पान
तुझे तूच देवा घेऊनि जा दान
तुझे तूच देवा घेऊनि जा दान
चित्त लागले रे पैलतीरी आता देवा
चित्त लागले रे पैलतीरी आता
तुझ्या पायथ्याला विसावला माथा

Trivia about the song Sampale Jeevan Sampali Hi Gatha by Bhimsen Joshi

Who composed the song “Sampale Jeevan Sampali Hi Gatha” by Bhimsen Joshi?
The song “Sampale Jeevan Sampali Hi Gatha” by Bhimsen Joshi was composed by Madhusudan Kalelkar, Kadam Ram.

Most popular songs of Bhimsen Joshi

Other artists of Film score