Anandi Anand Gade

BALKAVI THOMRE, HRIDAYNATH MANGESHKAR

आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे
इकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे
इकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंद गडे

वरती खाली मोद भरे वायूसंगे मोद फिरे
वरती खाली मोद भरे वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला दिशांत फिरला जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे
इकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहीकडे

सूर्यकिरण सोनेरी हे कौमुदी ही हसते आहे
सूर्यकिरण सोनेरी हे कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे
मेघ रंगले चित्त दंगले गान स्फुरले
इकडे तिकडे चोहीकडे
इकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती
डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे कोणाला गातात बरे
कमल विकसले भ्रमर गुंगले डोलत वदले
इकडे तिकडे चोहीकडे
इकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे

Trivia about the song Anandi Anand Gade by Lata Mangeshkar

Who composed the song “Anandi Anand Gade” by Lata Mangeshkar?
The song “Anandi Anand Gade” by Lata Mangeshkar was composed by BALKAVI THOMRE, HRIDAYNATH MANGESHKAR.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score