Asa Bebhan Ha Vara [Original]
असा बेभान हा वारा
असा बेभान हा वारा कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला
नदीला पूर आलेला कशी येऊ कशी येऊ
असा बेभान हा वारा
जटा पिंजून या लाटा विखाळी झेप ही घेती
जटा पिंजून या लाटा विखाळी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना दिशांचे भोवरे होती
जिवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू
तुझ्या पायी कशी ठेवू
नदीला पूर आलेला
नदीला पूर आलेला कशी येऊ कशी येऊ
कुळाच लौकिकाचे मी क्षणी हे तोडीले धागे
कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडीले धागे
बुडाले गाव ते आता बुडाले नाव ही मागे
दिले हे दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ
करी माझ्या कशी घेऊ
नदीला पूर आलेला
नदीला पूर आलेला कशी येऊ कशी येऊ
असा बेभान हा वारा
जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले
जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे तुझी होऊन मी आले
तुझे तु घे उरी आता किती मी हाक ही देऊ
किती मी हाक ही देऊ
नदीला पूर आलेला
नदीला पूर आलेला कशी येऊ कशी येऊ
असा बेभान हा वारा कुठे ही नाव मी नेऊ
असा बेभान हा वारा