Bhasma Vilepit

ANANDGHAN, SANTA SHELKE

भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करिते काननी
भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करिते काननी
वैभव भूषित वैकुंठेश्वर
तिच्या पित्याने योजियला वर
वैभव भूषित वैकुंठेश्वर
तिच्या पित्याने योजियला वर
भोळा शंकर परि उमेच्या भरलासे लोचनी
अपर्णा तप करिते काननी
त्रिशूल डमरू पिनाक पाणी
चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनी
त्रिशूल डमरू पिनाक पाणी
चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनी
युगायुगाचा भणंग जोगी तोच आवडे मनी
अपर्णा तप करिते काननी
कोमल सुंदर हिमनग दुहिता
हिमाचलावर तप आचरिता
कोमल सुंदर हिमनग दुहिता
हिमाचलावर तप आचरिता
आगीमधुनी फूल कोवळे फुलवी रात्रंदिनी
अपर्णा तप करिते काननी
भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी

Trivia about the song Bhasma Vilepit by Lata Mangeshkar

Who composed the song “Bhasma Vilepit” by Lata Mangeshkar?
The song “Bhasma Vilepit” by Lata Mangeshkar was composed by ANANDGHAN, SANTA SHELKE.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score