Dharani Mukli Mrugachya

Shantaram Athavale, Sudhir Phadke

धरणी मुकली मृगाच्या पावसाला
सुख माझे हरपले कुठे शोधू ग भावाला
अनंत गगनी तारका अगणित
तसे आठवू भावांचे गुण किती असंख्यात
चंद्राचे प्रतिबिंब गंगेच्या प्रवाहात
गंगेच्या प्रवाहात
चंद्राचे प्रतिबिंब गंगेच्या प्रवाहात
गंगेच्या प्रवाहात
भावाची रम्य मूर्ती उभी माझ्या मानसात
भावाची रम्य मूर्ती उभी माझ्या मानसात
देवाच्या देवळात गोड सनई वाजते
गोड सनई वाजते
देवाच्या देवळात गोड सनई वाजते
गोड सनई वाजते
भाऊरायाची प्रेमळ हाक अंगणात येते
भाऊरायाची प्रेमळ हाक अंगणात येते
वार्‍याची झुळूक आणी सुगंध फुलांचा
आणी सुगंध फुलांचा
वार्‍याची झुळूक आणी सुगंध फुलांचा
आणी सुगंध फुलांचा
सांग जिवाच्या मैत्रिणी गोड निरोप भावाचा
गोड निरोप भावाचा

Trivia about the song Dharani Mukli Mrugachya by Lata Mangeshkar

Who composed the song “Dharani Mukli Mrugachya” by Lata Mangeshkar?
The song “Dharani Mukli Mrugachya” by Lata Mangeshkar was composed by Shantaram Athavale, Sudhir Phadke.

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score