Dukh Na Anand Hi
दुःख ना आनंद ही अन् अंत ना आरंभ ही
नाव आहे चाललेली काल ही अन् आज ही
दुःख ना आनंद ही अन् अंत ना आरंभ ही
नाव आहे चाललेली काल ही अन् आज ही
दुःख ना आनंद ही
मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा
मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा
मी नव्हे की बिंब माझे मी न माझा आरसा मी न माझा आरसा
नाव आहे चाललेली काल ही अन् आज ही
दुःख ना आनंद ही
याद नाही साद नाही ना सखी वा सोबती
याद नाही साद नाही ना सखी वा सोबती
नाद आहे या घड्याला
नाद आहे या घड्याला अन् घड्याच्या भोवती अन् घड्याच्या भोवती
नाव आहे चाललेली काल ही अन् आज ही
दुःख ना आनंद ही
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली दूरची हाले हवा
दूरची हाले हवा दूरची हाले हवा
नाव आहे चाललेली काल ही अन् आज ही
दुःख ना आनंद ही अन् अंत ना आरंभ ही
नाव आहे चाललेली काल ही अन् आज ही
दुःख ना आनंद ही